Pages

Ads 468x60px

Sample text

Sample Text

Monday, October 22, 2012

सिलसिला संपला! यश चोप्रा यांचे निधन

Yash.jpg . टा . प्रतिनिधी , मुंबई

' रोमान्सचा बादशाह ' म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीवर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवणारे निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचे रविवारी सायंकाळी . ३०च्या सुमारास वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये डेंग्यूच्या आजाराने निधन झाले . ते ८० वर्षांचे होते . त्यांच्या पश्चात आदित्य आणि उदय ही मुले आणि पत्नी पामेला असा परिवार आहे .

' जब तक है जान ' या १३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होऊ घातलेल्या चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यावर निवृत्त होणार असल्याचे यश चोप्रा यांनी गेल्या महिन्यातच जाहीर केले होते . त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या सोहळ्यात अभिनेता शाहरूख खान याने घेतलेल्या मुलाखतीतच त्यांनी निवृत्तीविषयी भाष्य केले होते . त्यानंतर शनिवारी १३ ऑक्टोबर रोजी अशक्तपणा वाढल्यामुळे त्यांना लिलावतीमध्ये दाखल करण्यात आले . त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान त्याचवेळी झाले . मात्र , यश चोप्रा यांची प्रकृती खालावतच गेली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतला एक देदिप्यमान ' सिलसिला ' रविवारी संपला .

यश चोप्रा यांचे पार्थिव सोमवारी सकाळी अंत्यदर्शनासाठी अंधेरीच्या वीरा देसाई रोडवरील यशराज स्टुडिओमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

No comments:

Post a Comment