लोकमत ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २१ - हिंदी चित्रपटसृष्टीतील बुजुर्ग निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा यांचे रविवारी येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते डेंग्यूने आजारी होते. त्यासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात १३ ऑक्टोबर रोजी दाखल केले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली होती. पण रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. लम्हे, त्रिशूल, चांदणी, सिलसिला, वीर-झारा यासारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. त्यांच्या यश राज फिल्म्स या चित्रपट निर्मिती कंपनीने कायमच लोकप्रिय चित्रपट देण्याचा प्रयत्न केला होता. बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चनला दिवार या चित्रपटातून अँग्री यंग मॅन म्हणून सादर करण्यात त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांच्या यश राज फिल्म्सचा जब तक हैं जान हा चित्रपट येत्या काही दिवसांतच प्रदर्शित होणार होता.
No comments:
Post a Comment