Pages

Ads 468x60px

Sample text

Sample Text

Monday, October 22, 2012

'शहेनशाह' आणि 'बादशाहचा' शिल्पकार!

एबीपी माझा वेब टीम, मुंबई
Monday, 22 October 2012 08:17

रोमान्सचा बादशाह काळाच्या पडद्याआड


यश चोप्रा
यश चोप्रा
मुंबई:
यश चोप्रा रोमँटिक फिल्म्सच्या या बादशाहाने अखेरचा सलाम केला असला तरी त्यांचं बॉलिवुडमधील योगदान कधीच विसरता न येण्यासारखं आहे. बॉलिवुडला शहेनशाह आणि बादशाहही त्यांनीच मिळवून दिले.

यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानच्या रुपात दोन असे सितारे दिले ज्यांची धमक बॉलिवुडमध्ये आजही कायम आहे.

सत्तरी पार केलेल्या अमिताभ बच्चन यांच्या अदाकारीला सुरुवातीच्या काळात यश चोप्रांनी आकार दिला. ७० एमएम स्क्रीनवर अमिताभ यांची चमक आजही कायम आहे. प्रकाश मेहरा यांची फिल्म जंजीरने अमिताभ यांना ओळख मिळवून दिली खरी पण अमिताभ सुपरस्टार ठरले तो यश चोप्रांच्या दिवारमुळेच...

दीवारमधील अँग्री यंग मॅन कामगार हा यश चोप्रा यांचीच कल्पना होती. या फिल्ममधून यश चोप्रा यांनी हिरोला सूट-बूटच्या इमेजमधून तर बाहेर काढलंच पण 'जाओ पहले उस आदमी का साइन लेकर आओ ....जिसने मेरे हाथ पर ये लिख दिया'असं म्हणणाऱ्या हिरोची कायद्याच्या चौकटीतूनही सुटका केली.

थेट कायद्याला आव्हान देणारा माणूस हा फिल्मवेड्यांना भावला. भारतीय चित्रपटसृष्टीत हे प्रथमच घडत होतं आणि त्याचे शिल्पकार ठरले यश चोप्रा.

फिल्म त्रिशूलपर्यंत अमिताभ अँग्री यंग मॅनच्या इमेजमुळे सुपरस्टार झाले होते. असा सुपरस्टार जो अभिनय संपन्न संजीव कुमार यांच्या डोळ्यात डोळे घालून आपला हक्क खुले आम मागत होता.

नेहमी कॅमेऱ्याच्या मागे राहणारे यश चोप्रा खरं तर समाजाच्या सो कॉल्ड विचारसरणीपेक्षा खूप पुढे होते. फिल्म त्रिशूल हे त्याचं उत्तम उत्तम उदाहरण. एका कुमारिकेच्या पोटी जन्माला आलेल्या मुलगा आपल्या बापाच्या डोळ्यात डोळे घालून 'तुम मेरे नाजायज बाप हो', असे संवाद फेकेल असं त्या काळी कुणालाही वाटलं नव्हतं.

अॅक्शन असो वा रोमान्स. दोन्ही प्रकारच्या फिल्म्सवर यश चोप्रा यांची मजबूत पकड होती. इतकंच नाही तर एकाच कलाकाराकडून दोन्ही प्रकारच्या भूमिका करवून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. कारण १९७५ मध्ये दीवारमधील अँग्री यंग मॅन दिसला. तर १९७६ मध्ये कभी-कभीमधील शायर...

हळूवार प्रेमाचा हा सिलसिला १९८१ मध्येही कायम राहिला. सिलसिला या फिल्मची कहाणी तर अमिताभ बच्चन यांचीच मानली जाऊ लागली. या फिल्मची गाणी ३० वर्षांनंतरही आजही प्रत्येकाच्या ओठांवर आहेत.

अमिताभ बच्चन एव्हाना फिल्मी दुनियेचे शहेनशाह बनले होते आणि बॉलिवुडला गरज होती आणखी एका बादशाहची. या बादशाहची गरज पूर्ण केली ती यश चोप्रांनीच. त्या बादशाहचं नाव होतं... शाहरूख खान. १९९३ मध्ये आलेल्या डर सिनेमाच्या माध्यमातून यश चोप्रांनी फिल्मी दुनियेला एक असा नायक दिला जो प्रेमाच्या नावाखाली प्रेक्षकांना दहशतीत ठेवत असे.

याच फिल्ममुळे शाहरूखची बॉलिवुडवर पकड घट्ट बसली. पण लगेचच यश चोप्रा यांनी अमिताभ यांच्याप्रमाणेच शाहरुखलाही अँग्री यंग मॅनच्या वलयातून बाहेर काढून रोमँटिक हिरोचा साज चढवला.

दिलवाले दुल्हनिया ले जाएँगेचा हा सिलसिला दिल तो पागल है आणि पुढे वीर झारापर्यंत सुरु राहिला. आणि योगायोग असा की यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट जब तक है जान हाही प्रेक्षकांना प्रेमाचा संदेश देणाराच आहे.

तरुणाईला प्रेम करायला शिकवणारे यश चोप्रा आता उरले ते फक्त आठवणींमध्ये...

प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचं निधन

एबीपी माझा वेब टीम, मुंबई
Sunday, 21 October 2012 18:48

'जब तक थी जान...!'

मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८० वर्षांचे होते.
डेंग्यूच्या आजारामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
'जब तक है जान' हा आपला अखेरचा चित्रपट असेल, त्यानंतर आपण निवृत्ती घेऊ, असं यश चोप्रा यांनी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणेच नियतीनेही हा त्यांचा अखेरचाच चित्रपट ठरवला.
निवृत्तीनंतर आपण चित्रपटनिर्मितीत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
रोमान्सचा बादशाह म्हणून यश चोप्रा यांची ख्याती आहे. ‘जब तक है जान’ हा त्यांचा कारकीर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत.
यश चोप्रांच्या निधनाची बातमी समजताच शाहरुख खान, अनिल कपूर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी लीलावतीकडे धाव घेतली.
यश चोप्रा यांची बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळख आहे. रोमॅन्टिक फिल्ममधील मास्टर म्हणून ते ओळखले जायचे.
दिवार, कभी कभी, त्रिशूल, सिलसिले मशाल, विजय, चांदणी यांसह दिल तो पागल है, वीर झारा असे सुपरहिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले.
सिनेसृष्टीतील उत्तुंग कामगिरीबद्दल यश चोप्रा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामध्ये नॅशनल फिल्म अॅवॉर्ड आणि ११ फिल्मफेअर अॅवॉर्डचा समावेश आहे. याशिवाय भारत सरकारच्या दादासाहेब फाळके आणि पद्म भूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 ला लाहोरमध्ये झाला होता.
यश चोप्रा यांचं पार्थिव उद्या सकाळी ९ ते १२ या वेळेत यशराज स्टुडिओमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत यश चोप्रांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

यश चोप्रा काळाच्या पडद्याआड

लोकमत  ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २१ - हिंदी चित्रपटसृष्टीतील बुजुर्ग निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा यांचे रविवारी येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते डेंग्यूने आजारी होते. त्यासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात १३ ऑक्टोबर रोजी दाखल केले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली होती. पण रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
लम्हे, त्रिशूल, चांदणी, सिलसिला, वीर-झारा यासारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. त्यांच्या यश राज फिल्म्स या चित्रपट निर्मिती कंपनीने कायमच लोकप्रिय चित्रपट देण्याचा प्रयत्न केला होता. बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चनला दिवार या चित्रपटातून अँग्री यंग मॅन म्हणून सादर करण्यात त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांच्या यश राज फिल्म्सचा जब तक हैं जान हा चित्रपट येत्या काही दिवसांतच प्रदर्शित होणार होता.

यश चोप्रा - अल्पपरिचय

यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 रोजी त्यावेळी भारतात असलेल्या लाहोरमध्ये झाला. त्यांना आठ भावंडे होती. शिक्षणासाठी ते जालंधरला गेले. फाळणीनंतर ते भारतात आले आणि पंजाबमधील लुधियानात वसले. मोठे भाऊ बी. आर. चोप्रा यांच्या मदतीने त्यांनी तेथे घर घेतले; परंतु चित्रपटांची मोठी आवड असल्याने त्यांनी थेट मुंबई गाठली. दिग्दर्शक आय. एस. जोहर यांच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून ते काम करू लागले. सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी "एक ही रास्ता' (1956), "नया दौर' (1957), "साधना' (1958) या चित्रपटांसाठी काम पाहिले. पुढे 1959 मध्ये त्यांनी "धूल का फूल' या चित्रपटाचे स्वतंत्रपणे दिग्दर्शन केले. त्यानंतर "धरमपुत्र' (1961), "वक्त' (1965), "आदमी और इन्सान' (1969) हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.
त्यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला "दाग' 1973 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर त्यांनी "जोशिला', "दीवार', "कभी कभी', "त्रिशूल', "सिलसिला', "फासले', "चांदनी', "लम्हे', "डर', "दिल तो पागल है', "वीर झारा', "जब तक है जान' अशा 22 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. "कभी कभी', "दुसरा आदमी', "नूरी', "काला पत्थर', "धूम', "दिलवाले दुल्हनियॉं ले जायेंगे', "मोहब्बतें', "साथिया', "हम तुम', "बंटी और बबली', "सलाम नमस्ते', "चक दे इंडिया', "इश्‍कजादे', "लेडीज व्हर्सेस रिकी बहेल' आदी चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली. त्यापैकी "दिलवाले दुल्हनियॉं ले जायेंगे' आजही मराठा मंदिर चित्रपटगृहात मुक्काम ठोकून आहे.
चोप्रा यांचा मुलगा आदित्य याने "दिलवाले दुल्हनियॉं ले जायेंगे' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पहिले पाऊल टाकले. "वीर झारा' या चित्रपटानंतर त्यांनी अगदी आतापर्यंत चित्रपटाचे दिग्दर्शन केले नव्हते. त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट "जब तक है जान' दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटसृष्टीला दिलेल्या लक्षणीय योगदानाबद्दल चोप्रा यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांना 2005 मध्ये "पद्मभूषण' किताब प्रदान करण्यात आला. स्वित्झर्लंड सरकारनेही त्यांना सन्मानित केले होते. त्यांना 2001 मध्ये मानाचा "दादासाहेब फाळके पुरस्कार' प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने राज कपूर आणि व्ही. शांताराम पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मध्य प्रदेश सरकारने किशोर कुमार पुरस्काराने सन्मानित केले. "फिल्मफेअर' पुरस्कारांचा मान त्यांना अनेकदा लाभला. "इंडियन फिल्म ऍकॅडमी'नेही त्यांना गौरवले होते.

चित्रपट निर्माता यश चोप्रा यांचे निधन

www.24taas.com, मुंबई
प्रसिध्द चित्रपट निर्माता यश चोप्रा (८० ) यांचे आज लिलावती रूग्णालयात निधन झाले. यश चोप्रा यांना डेंग्यू झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

चोप्रा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना बांद्रा येथील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यश चोप्रा यांनी गेल्या महिन्यात वाढदिनी सेवानिवृत्ती जाहीर केली होती. ही सेवानिवृत्ती ‘जब तक है जान’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर घेणार असल्याचे स्पष्टे केले होते. मात्र, त्या आधी त्यांना देवआज्ञा झाली.

‘जब तक है जान’ हा सिनेमा येत्या दिवाळीत १३ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात कतरिना, शाहरूख खान, अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. यश चोप्रां यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्यांनी पाच दशकांहूनही अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये अधिराज गाजवले आहेत. दीवार, कभी कभी, त्रिशूल, सिलसिला, चांदणी, वीर जारा आदी त्यांचे चित्रपट हिट्स झाले आहेत.

‘किंग ऑफ रोमान्स’ अर्थात ज्येष्ठ दिग्दर्शक यश चोप्रा यांचे निधन

प्रतिनिधी, मुंबई

चित्रपट निर्माता यश चोप्रा यांचे निधनहिंदी चित्रपटसृष्टीत १९५९ सालापासून अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत असलेले ‘किंग ऑफ रोमान्स’ अशी स्वत:ची आगळी प्रतिमा निर्माण करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक आणि यशराज फिल्म्सचे संस्थापक यश चोप्रा यांचे डेंग्यूमुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कारकिर्दीची पन्नाशी आणि वयाची ऐंशी वर्ष त्यांनी नुकतीच पूर्ण केली होती. अभिनेता शाहरूख खानने वाढदिवसानिमित्त त्यांची मुलाखत घेतली होती. तेव्हाच ‘जब तक है जान’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर आपण निवृत्त होणार असल्याचे यश चोप्रा यांनी जाहीर केले होते. हा चित्रपट १३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. परंतु, दिग्दर्शनातला आपला शेवटचा चित्रपट प्रदर्शित झालेला पाहण्यासाठी यश चोप्रा नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आदित्य व उदय असा परिवार आहे.
डेंग्यूचे निदान झाल्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन-तीन दिवसांनीच त्यांची प्रकृती सुधारत आहे असे वृत्तही आले होते. ‘दिवार’, ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘मशाल’, ‘त्रिशूल’ असे अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले होते. बॉलीवूडपटांचे चित्रीकरण काश्मीर आणि स्वित्झर्लण्डमध्ये करण्याचा प्रघात त्यांनी सुरू केला, असे मानले जाते.
बॉलीवूडमध्ये सर्वाधिक काळ चाललेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाची निर्मितीही यश चोप्रा यांनी केली होती. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या शाहरूख व काजोल यांना घेऊन केलेल्या या चित्रपटाद्वारे यश चोप्रांचा मुलगा आदित्य चोप्राने दिग्दर्शनात पदार्पण केले.
लाहोर येथे २७ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेले यश चोप्रा खिशात केवळ २०० रुपये घेऊन मुंबईत दाखल झाले. दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या या तरुणाने नंतर बॉलीवूडमधील सर्वात बडे प्रॉडक्शन हाऊस अशी ख्याती यशराज फिल्म्सला मिळवून दिली. दरवर्षी किमान तीन चित्रपट निर्मित करण्याचा यशराज फिल्म्सचा प्रघात आहे. मोठे बंधू बी आर चोप्रा यांचे सहाय्यक दिग्दर्शक बनण्यापूर्वी आय एस जोहर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रांनी कारकिर्दीला सुरुवात केली. १९५९ साली झळकलेल्या ‘धूल का फूल’ या चित्रपटाद्वारे स्वतंत्रपणे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.
रोमॅण्टिक चित्रपटांवर आपला अमीट ठसा उमटविणाऱ्या यश चोप्रा यांनी वेगवेगळ्या काळात नंबर वन पदावर असलेल्या लोकप्रिय कलावंतांना घेऊन अनेक चित्रपट केले.

सिलसिला संपला! यश चोप्रा यांचे निधन

Yash.jpg . टा . प्रतिनिधी , मुंबई

' रोमान्सचा बादशाह ' म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीवर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवणारे निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचे रविवारी सायंकाळी . ३०च्या सुमारास वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये डेंग्यूच्या आजाराने निधन झाले . ते ८० वर्षांचे होते . त्यांच्या पश्चात आदित्य आणि उदय ही मुले आणि पत्नी पामेला असा परिवार आहे .

' जब तक है जान ' या १३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होऊ घातलेल्या चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यावर निवृत्त होणार असल्याचे यश चोप्रा यांनी गेल्या महिन्यातच जाहीर केले होते . त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या सोहळ्यात अभिनेता शाहरूख खान याने घेतलेल्या मुलाखतीतच त्यांनी निवृत्तीविषयी भाष्य केले होते . त्यानंतर शनिवारी १३ ऑक्टोबर रोजी अशक्तपणा वाढल्यामुळे त्यांना लिलावतीमध्ये दाखल करण्यात आले . त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान त्याचवेळी झाले . मात्र , यश चोप्रा यांची प्रकृती खालावतच गेली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतला एक देदिप्यमान ' सिलसिला ' रविवारी संपला .

यश चोप्रा यांचे पार्थिव सोमवारी सकाळी अंत्यदर्शनासाठी अंधेरीच्या वीरा देसाई रोडवरील यशराज स्टुडिओमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

सिनेदिग्दर्शक यश चोप्रा यांचं निधन

chopra.jpgमटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
प्रसिद्ध हिंदी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता यश चोप्रा यांचं मुंबईत रविवारी निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. चोप्रा यांना डेंग्यू झाल्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

हिंदी सिनेसृष्टीत दिग्दर्शक आणि सिने निर्माता म्हणून गेली ५० वर्ष ते सक्रिय होते. त्यांनी सिनेमांत हाताळलेल्या विविध विषयांमुळे चोप्रा यांना 'किंग ऑफ रोमान्स' असंही म्हटलं जायचं. चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेले रोमान्स, अॅक्शन आणि भावनाप्रधान पठडीतले अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाले होते. त्यांच्या सिनेमांद्वारे अनेक कलाकारांना सिनेकरिअर उंचावण्यात मदत मिळाली होती.

यश चोप्रा यांनी १९७१ साली स्वतःच्या नावाने 'यश राज फिल्म' या बॅनरची स्थापना केली. यश राज बॅनर हे सध्याचं हिंदी सिनेसृष्टीतलं सर्वाधित प्रतिष्ठित आणि लोकप्रिय बॅनर मानलं जातं. चोप्रा यांनी एकूण ५३ सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं.

यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर तुफान लोकप्रिय ठरलेल्या काही निवडक सिनेमांमध्ये 'वक्त', 'दीवार', 'त्रिशूल' 'कभी कभी' 'सिलसिला', 'चांदनी', 'लम्हे', 'डर' 'दिल तो पागल है' आणि 'विरजारा' या सिनेमांचा समावेश होतो. चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला, आगामी 'जब तक है जान' हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला आहे. शाहरुख खान, कत्रिना कैफची भूमिका असलेल्या या सिनेमात ब-याच कालावधीनंतर काश्मिरचे चित्रिकरण करण्यात आले होते. हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

सिनेसृष्टी शोकमग्न
यश चोप्रा यांच्या निधनाचे वृत्त कळताच समाजाच्या सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

' रोमान्य आणि सामाजिक नाट्यासारखा विषय उत्कटपणे हाताळून त्याची पडद्यावर इतकी सुंदर मांडणी दुस-या कुणाही दिग्दर्शकाने केली नाही. त्यांनी हिंदी सिनेमाला सातासमुद्रापार नेण्याच काम केलं. याबाबत अनेक देशांनी त्यांचा सत्कारही केला होता. ते सदैव लक्षात राहतील.' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे.


सिने अभिनेता अक्षय कुमार म्हणाला, 'मला या बातमीमुळे धक्का बसला आहे. विश्वासच बसत नाही. चोप्रा यांनी पडद्यावर प्रेमाला अमर केलं.'

अभिनेत्री शबाना आझमी म्हणाल्या, 'तुम्ही आणखी ऐंशी सिनेमे दिग्दर्शित करावेत अशी मी तुम्हाला ऐंशीव्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या होत्या. तुम्ही असं कसं हे सगळं सोडून गेलात?